“निशुल्क स्वच्छ घर, सुंदर आंगण स्पर्धा” ग्रामपंचायत कार्यालय जलंब याच्या संयुक्त विद्यमाने अभियान राबवण्याचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय जलंब याच्या संयुक्त विद्यमाने

 

“निशुल्क स्वच्छ  घर, सुंदर आंगण स्पर्धा”

 

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. स्दवच्रछतेचा संदेश हि जीवनभर गाडगे महाराजांनी समाजाला दिला. दर वर्षी आपण दिवाळी मोठ्या उत्सवाने साजरी करतो यावर्षी हि दिवाळी स्वच्छता या विषयाला समर्पित होवून साजरी करूया.

 

दिनांक : १८-१०-२०२५ ते २५-१०-२०२५

 

स्पर्धेची नियम व अटी

 

१) स्पर्धा मध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी  अनिवार्य आहे. नोंदणी ची अंतिम तारीख १७-१०-२०२५.

२) आपले घर स्वच्छ व आंगण सुंदर ठेवण्यासाठी ८ दिवस सहभागी चे दररोज पडताळणी समिती करेल.

३) घर साफ स्वच्छ – ठेवण्यासाठी आपली कल्पकता वापरून पर्यावरण पूरक वस्तूचा उपयोग करू शकता.

४) आंगण साफ स्वच्छ – ठेवण्यासाठी रांगोळी, शेणाचा सडा, तुळस, दरवाजा वर शुभ लाभ, डस्टबीन च्या वापरासह आपली कल्पकता वापरून सजावट करू शकता.

५) सांड पानी विल्हेवाट, विद्युत सजावट, जलसंवर्धन, पारिवारिक व  वैयक्तीक स्वच्छता, भारतीय संस्कृती वेश परिधान, वृक्ष लागवड, परसबाग, सह कल्पकता वापरून आदर्श घर व आंगण सजावटीस प्राधान्य देवू शकता.

६) भारतीय संस्कृती व विविध विषयावरील कोटेशन, भिंन्ति वर लिहून ग्राम स्वच्छतेचा संदेश.

७) हि स्पर्धा फक्त जलंब गावासाठी आहे.

८) ग्रामपंचायत टॅक्स, नळ टॅक्स, भरणाऱ्या घराला स्पर्धेत २ गुणाचे बोनस मिळेल.

९) स्पर्धेतील सहभागी च्या घराला पडताळणी समिती मधील -, ग्राम विकास अधिकारी,  बी. डी. ओ., तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालक मंत्री भेट देवू शकतात.

१०) स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय, येणाऱ्या घराला पारितोषिक व प्रत्येक वार्डातून ५ घराला प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात येतील.

११) नोंदणी साठी संपर्क क्रमांक : ९४०३०७२६३२, ९५११६२८७९२, ८६०००८४९४१,